Results of 1354 schools in Mumbai are 100%; After Konkan, Amravati division also won

राज्याच्या निकालामध्ये यंदा कोकण विभागापाठोपाठ अमरावती विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा १०० टक्के तर अमरावतीचा निकाल ९९.९८ टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई, पुणे, नाशिक विभागाचा निकाल ९९.९६ टक्के इतका लागला आहे. मात्र या विभागातील मुलांनी विशेष प्रावीण्य मिळवण्यात बाजी मारली आहे. मुंबईतील ३ लाख ४७ हजार ६८३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १० हजार ९७९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. तसेच १ लाख ५९ हजार ८११ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे.

    मुंबई: मूल्यमापन पद्धतीने जाहीर करण्यात आलेल्या निकालात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी मुंबई, पुणे विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवण्यात बाजी मारली आहे. मुंबईतून सर्वाधिक १ लाख १० हजार ९७९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. त्याखालोखाल पुणे विभागातील १ लाख २ हजार ४७६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे.

    राज्याच्या निकालामध्ये यंदा कोकण विभागापाठोपाठ अमरावती विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा १०० टक्के तर अमरावतीचा निकाल ९९.९८ टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई, पुणे, नाशिक विभागाचा निकाल ९९.९६ टक्के इतका लागला आहे. मात्र या विभागातील मुलांनी विशेष प्रावीण्य मिळवण्यात बाजी मारली आहे. मुंबईतील ३ लाख ४७ हजार ६८३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १० हजार ९७९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. तसेच १ लाख ५९ हजार ८११ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे.

    त्याखालोखाल पुणे विभागातील १ लाख २ हजार ४७६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य तर १ लाख १६ हजार १७२ प्रथम श्रेणी मिळवली आहे. औरंगाबादमधून ९६ हजार ५४२, अमरावतीमधून ८३ हजार, नाशिकमधून ७८ हजार २१४ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. त्यामुळे विशेष प्रावीण्य मिळवण्याबरोबरच प्रथम श्रेणीमध्येही उत्तीर्ण होणाऱ्याा विद्यार्थ्यांचीही संख्याही मुंबई पुणे विभागामध्ये अधिक दिसून आली. प्रथम श्रेणीमध्ये मुंबई, पुणे विभागानंतर नाशिकमधील ९८ हजार ८२५ विद्यार्थी, नागपूर ७७ हजार २८६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.