सोने आणि चांदी
सोने आणि चांदी

मुंबई: (Mumbai).  कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीच्या दराम घसरण दिसून येत असली तरी प्रत्यक्षात राज्यात या दोन्ही मौल्यवान धातुंच्या दरात बुधवारी वाढ झाली आहे. देशपातळीवर विचार केल्यास २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी सरासरी ५०,५०० रुपये इतका होता. तर २२ कॅरेट सोन्याला प्रतितोळा ४९,२०० रुपये इतका भाव होता.

महाराष्ट्रातील सराफा बाजारात बुधवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा १८० रुपयांची वाढ झाली आणि दर ५१,२७१ इतके नोंदविण्यात आले.
या तुलनेत २२ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा १७५ रुपयांनी वाढून ते ४९,५९० रुपये इतक्यावर पोहोचले. राज्यात चांदीच्या दरातसुद्धा प्रतिकिलोमागे २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी चांदीचे दर प्रतिकिलो ६३,२०० रुपये इतके होते.