अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढवणार; ठाकरे सरकारचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे असेल. त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करण्याचे या बैठकीत मान्य करण्यात आले आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारने कोरोनाकाळात महत्वाची कामगिरी करणा-या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांना सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. कोरोना संकटाच्या काळात आरोग्य विभागात मनुष्यबळाच्या टंचाईचा मुद्दा लक्षात घेता हा महत्वाचा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.

    गट-अ मधील वैद्यकीय अधिका-यांना लागू

    राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे असेल. त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करण्याचे या बैठकीत मान्य करण्यात आले आहे.

    निर्बंध जैसे थे

    राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमावलीसह लोकल सुरु करण्याबाबत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासाचा विचार व्हावा, अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली. मात्र, त्याबाबत आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे राज्यभरात व्यापा-यांसाठी कोरोना निर्बंध शिथील करण्याबाबत या बैठकीत निर्णय अपेक्षीत होता मात्र त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.