सुशांत प्रकरणी नव्या माहितीचा उलगडा, संदीप सिंग होता मुंबई पोलिसांच्या संपर्कात

संदीप सिंग हा शव नेणाऱ्या वाहन चालकाप्रमाणेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बांद्रा पोलीसांच्या संपर्कात होता. यामागील कारण काय आहे. याबाबतीचा सखोल तपास सीबीआय करणार आहे. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर संदीप सतत पुढे होता. तसेच सुशांतचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे देखील संदीपकडे होते.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला २ महिन्याचा काळ पूर्ण झाला आहे. तरी त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु प्रकरण सीबीआयकडे गेल्याने या घटनेत अनेक नवी नवी माहिती समोर येत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र व दिग्दर्शक संदीप सिंग हा वांद्रे पोलीसांच्या संपर्कात होता.(Sandeep Singh was in touch with Mumbai Police) वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते. संदीप सिंग च्या मोबाईल कॉल डिटेल्समधून ही धक्कादायक बाब समजली आहे.

संदीप गेले १ वर्ष सुशांतच्या संपर्कात नव्हता परंतु मृत्यूच्या काही काळ आधीपासून तो सुशांतसोबत होता. कूपर रुग्णालयातील शवगृहातही रियाला संदीपने प्रवेश मिळवून दिला होता. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.