पालकमंत्र्याच्या अघोषित बहिष्कारानंतर राज्यपालांचा यु टर्न, म्हणाले…

माझा स्वभावच असा आहे की, मी फिल्डवर जाऊन पाहणी करतो. फिल्डवर गेल्याने शिकायला मिळते. मात्र मध्येच कोविड आला आणि त्यामुळे जाणं-येणंच बंद झाले.

  मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्य सरकारने (State Government) दौऱ्यावर (Marathwada Tour) आक्षेप घेतल्यानंतर तीनही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात (Collectors Office) जाऊन आढावा बैठका (Review Meetings) घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय त्यांनी नियोजित वस्तीगृह इमारतीचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम देखील रहित केला.

  पालकमंत्र्यांचा अघोषित बहिष्कार

  राज्य सरकारच्या आक्षेपानंतर मराठवाडा दौऱ्यातील (Tour Of Marathwada) कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले. याचे कारण राज्यपालांच्या दौऱ्यावर पालकमंत्र्यांनी अघोषित बहिष्कार (Unannounced boycott by Guardian Minister) घातल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी माध्यमांना दिली. राज्यपालांचा दौऱ्यात राजशिष्टाचाराचे संकेत धुडकावून तीनही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची गैरहजेरी असल्याचे चित्र दिसत असल्याने राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार मधील वाद (Dispute) आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

  फिल्डवर गेल्याने शिकायला मिळते

  दरम्यान, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे स्वागत करण्यात आले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्यासह विद्यापीठातील सर्वच अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, माझा स्वभावच असा आहे की, मी फिल्डवर जाऊन पाहणी करतो. फिल्डवर गेल्याने शिकायला मिळते. मात्र मध्येच कोविड आला आणि त्यामुळे जाणं-येणंच बंद झाले.

  राज्यपाल नसतो तरी आलो असतो

  ते म्हणाले की, मी महाराष्ट्राचा राज्यपाल नसतो झालो तरी, नांदेडचे गुरू गोविंदसिंग, छत्रपती शिवराय माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. म्हणून मला नेहमी नांदेडला जावे असे वाटले होते. ते म्हणाले की, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राहूनच मी माझे काम करत आहे, केवळ सवंग टीका आणि प्रसिध्दी करिता काही राजकारण करण्यापेक्षा लोकांना शक्य ती मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे.

  Review meetings canceled in all three districts after unannounced boycott of Guardian Minister Governor Bhagat Singh Koshyari says that