महत्त्वाची बातमी : पोलीस भरतीचा सुधारित आदेश जारी ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व याचिकांना अंतरिम स्थगिती

उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले होते. तसेच १२५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.

मुंबई : मराठा आरक्षणावरून राजकारण तापले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्व याचिकांना अंतरिम स्थगिती दिली असून सुधारित आदेश काढला आहे. यात मागास प्रवर्गाकरीता (एसईबीसी) आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी असे सुधारित आदेशात नमूद करण्यात आले आहे. यात विविध घटकांनुसार वेगवेगळे नियम लागू असणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस खात्यात १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात ५३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले होते. तसेच १२५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.