रियाच्या कुटुंबीयांना कोणेतही समन्स प्राप्त झाले नाही, वकीलाचा खुलासा

रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना अद्याप सीबीआयकडून चौकशीसाठी समन्स मिळालेले नाही." सीबीआयने रिया आणि तिच्या कुटूंबाला बोलावले तर ते हजर होतील, ते यापूर्वी मुंबई पोलिस आणि ईडीसमोर हजर झाले होते त्याप्रमाणे ते चौकशीसाठी उपस्थित असतील.

मुंबई : रियाचे वकील, रिया किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत. अशा प्रकारच्या बातमीला रियाच्या वकीलांनी नकार दिला आहे. वकीलांनी सांगितले की कोणत्याही प्रकराचे समन्स प्राप्त झाले नाही. सुशांतसिंग राजपूत प्रकरणी सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी केंद्रीय एजन्सी ईडीकडून रियावर दोनदा चौकशी केली गेली होती. रियाचा भाऊ शौविक याचीही ईडीने चौकशी केली होती.

रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना अद्याप सीबीआयकडून चौकशीसाठी समन्स मिळालेले नाही.” सीबीआयने रिया आणि तिच्या कुटूंबाला बोलावले तर ते हजर होतील, ते यापूर्वी मुंबई पोलिस आणि ईडीसमोर हजर झाले होते त्याप्रमाणे ते चौकशीसाठी उपस्थित असतील.

मंगळवारी सिद्धार्थ पिठानी यांना पुन्हा सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. सिद्धार्थ डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला आहे जेथे सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून त्याची विचारपूस केली जात आहे. यापूर्वी सीबीआयने आतापर्यंत तीन वेळा पिठानीला प्रश्न विचारले आहेत. सुशांतच्या घरी दोनदा पोहोचलेल्या सीबीआय टीमसमवेत पिठानी देखील उपस्थित होते.