प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

लोकसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण प्रकरणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळा वेश परिधान करून सभागृहात आल्याबद्दल सभापतींनी त्यांना समज दिली. त्यानंतर मेटे यांना फलक काढून टाकण्यास सांगितले. त्यानंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.  मराठा आरक्षण प्रकरणी निर्माण झालेल्या पेचाबद्दल समाजातील तरुणांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे ,तिथे येणाऱ्या राज्यभरातील मराठा आंदोलकांना मुंबई बाहेर रोखून अटक करण्यात येत आहे , राज्यभरात घरात घुसून त्यांना अटक होते असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन प्रस्ताव मांडताना केला. सभापतींनी प्रस्ताव नाकारत त्यांना म्हणणे मांडण्याची परवानगी दिली. 

मुंबई (Mumbai).   लोकसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण प्रकरणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळा वेश परिधान करून सभागृहात आल्याबद्दल सभापतींनी त्यांना समज दिली. त्यानंतर मेटे यांना फलक काढून टाकण्यास सांगितले. त्यानंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.  मराठा आरक्षण प्रकरणी निर्माण झालेल्या पेचाबद्दल समाजातील तरुणांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे ,तिथे येणाऱ्या राज्यभरातील मराठा आंदोलकांना मुंबई बाहेर रोखून अटक करण्यात येत आहे , राज्यभरात घरात घुसून त्यांना अटक होते असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन प्रस्ताव मांडताना केला. सभापतींनी प्रस्ताव नाकारत त्यांना म्हणणे मांडण्याची परवानगी दिली.

ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ही प्रलंबित आहे, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, समाजात यामुळे तेढ निर्माण होत आहे, दुफळी माजतेय असा आरोप दरेकर यांनी केला.  विनायक मेटे यांनी परिधान केलेले काळे कपडे काढून टाकले तरच बोलायला देऊ असे सभापती यांनी सांगत कामकाज पाच मिनिटे तहकूब केले. नवनिर्वाचित सदस्य गोपीचंद पडळकर यांचा परिचय विधानकार्य मंत्र्यांनी सभागृहात करून दिला. त्यावेळीही सभागृहात गदारोळात कामकाज सुरू होते.विधानपरिषद कामकाज पुन्हा सुरुवात झाल्यावर ही मेटे यांनी काळे कपडे न बदलल्याबद्दल सभापतींनी नाराजी व्यक्त करत त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली.  यावर संतप्त झालेल्या मेटे यांनी सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणा सुरू केल्या. त्याला विरोधी सदस्यांनी ही साथ देत आपापल्या जागा सोडल्या.

अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत हक्कभंग प्रकरणी समितीला मुदतवाढ देणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, विरोधी पक्षनेत्यांनी त्याला विरोध केला होता, गदरोळातच अनेक कागदपत्रे सादर करण्यात आली आणि कामकाज अर्ध्या तासाच्या साठी तहकूब करण्यात आले.