पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, डिझेलचे भाव स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव

गेले दोन दिवस स्थिर असलेले पेट्रोलचे भाव आज पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तर डिझेलच्या भावात मात्र कुठलीही वाढ झालेली नाही. देशातील 4 प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोलच्या किमतीत साधारण 40 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. दरम्यान बुधवारी आणि गुरुवारी पेट्रोलच्या किमतीत कुठलीही वाढ झाली नव्हती. गेल्या काही दिवसांत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. अशा स्थितीत पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  मुंबई : गेले दोन दिवस स्थिर असलेले पेट्रोलचे भाव आज पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तर डिझेलच्या भावात मात्र कुठलीही वाढ झालेली नाही. देशातील 4 प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोलच्या किमतीत साधारण 40 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे.

  दरम्यान बुधवारी आणि गुरुवारी पेट्रोलच्या किमतीत कुठलीही वाढ झाली नव्हती. गेल्या काही दिवसांत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. अशा स्थितीत पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  तसेचं राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे दरही आता शंभरी गाठताना दिसत आहे. अशावेळी आंततराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती पाहिल्या तर त्यातही मोठी वाढ होताना दिसत आहे. क्रूड ऑईल बेंचमार्क ब्रेंटचा दर 0.28 टक्क्यांनी वाढून 75.82 डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर WIT क्रूड ऑईलचा भाव 0.25 टक्क्यांनी वाढून 75.15 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे.

  33 दिवस पेट्रोलच्या दरात वाढ

  5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर 4 मे पासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. 4 मेनंतर आजपर्यंत पेट्रोलच्या दरात एकूण 33 वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 32 वेळा वाढ झालीय. या भाववाढीमुळे देशातील अधिकाधिक पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा भाव रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे.

  तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर (प्रति लीटर)

  • नवी दिल्ली – पेट्रोल – 99.16 रुपये, डिझेल – 89.18 रुपये
  • मुंबई – पेट्रोल 105.24 रुपये, डिझेल – 96.72 रुपये
  • कोलकाता – पेट्रोल – 99.04 रुपये, डिझेल – 92.03 रुपये
  • चेन्नई – पेट्रोल 100.13 रुपये , डिझेल 93.72 रुपये
  • नोएडा – पेट्रोल 96.42 रुपये, डिझेल 89.67 रुपये
  • बंगळुरु – पेट्रोल 103.5 रुपये, डिझेल 94.54 रुपये
  • हैदराबाद – पेट्रोल 113.05 रुपये, डिझेल 97.20 रुपये
  • पटना – पेट्रोल 101.21 रुपये, डिझेल 94.52 रुपये
  • जयपूर – पेट्रोल 105.91 रुपये, डिझेल 98.29 रुपये
  • लखनऊ – पेट्रोल 96.31रुपये, डिझेल 89.59 रुपये
  • गुरुग्राम – पेट्रोल 96.86 रुपये, डिझेल 89.78 रुपये
  • चंदीगढ – पेट्रोल 95.36 रुपये, डिझेल 88.81 रुपये

  पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

  एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

  दररोज 6 वाजता किमती बदलतात

  दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

  त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.