sushant-rhea

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी गेल्या आठवड्याभरापासून सीबीआय कसून चौकशी करत आहे. यामध्ये अनेक नवीन नवीन माहिती समोर येत आहे. अनेक माहितींचा उलगडा सीबीआयने केला आहे. सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरजचीही चौकशी केली आहे. तर आता सीबीआयने रियाला समन्स बजावला आहे.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput) प्रकरणी रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) सीबीआयने समन्स बजावल्याचे समजते आहे. सीबीआयला रियाची चौकशी करायची आहे. यापूर्वी ईडीनेही रियावर दोनदा चौकशी केली आहे. रियाचा भाऊ शोविक (shovik) याची काल सीबीआयने चौकशी केली.

ईडीने शोविकचीही चौकशी केली आहे. ईडीने काल रियाचे वडील इंद्रजीत यांचीही चौकशी केली आणि बँकेच्या व्यवहार तसेच बँकेत असलेल्या लॉकरचीही चौकशी केली. तसेच रिया सीबीआयचा मुक्काम असलेल्या अतिथीगृहात चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी गेल्या आठवड्याभरापासून सीबीआय कसून चौकशी करत आहे. यामध्ये अनेक नवीन नवीन माहिती समोर येत आहे. अनेक माहितींचा उलगडा सीबीआयने केला आहे. सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरजचीही चौकशी केली आहे. तर आता सीबीआयने रियाला समन्स बजावला आहे. रिया तिच्या भावासोबत आज साडे दहाच्या सुमारास घरातून निघाली आहे. सीबीआयच्या अतिथीगृहात रिया पोहचल्यावर तिची चौकशी सुरु केली जाईल.