रिया चक्रवर्तीला तुरुंगातच रहावे लागणार, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

खालच्या कोर्टाने रियाची जामीन याचिका फेटाळून लावली होती. रियाला एनसीबीने अटक केली त्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रिया सध्या तुरूंगात आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनी झैद विलट्रा, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, अब्दुल बासित परिहार यांच्याही याचिकेस नकार दिला आहे.

मुंबई : सुशांतसिंग राजपूत ( Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूच्या प्रकरणात उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणात अटक झालेल्या रिया चक्रवर्तीचा (Rhea Chakraborty) जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. काल कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. रिया सध्या भायखळा तुरूंगात आहे. सत्र न्यायालयातून बेल नाकारल्यानंतर रियाचे वकील मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे.

यापूर्वी खालच्या कोर्टाने रियाची जामीन याचिका फेटाळून लावली होती. रियाला एनसीबीने (NCB) अटक केली त्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रिया सध्या तुरूंगात आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती  (Shovik Chakraborty) यांनी झैद विलट्रा, (Zaid Vilatra) सॅम्युअल मिरांडा, (Samuel Miranda) दिपेश सावंत, अब्दुल बासित परिहार यांच्याही याचिकेस नकार दिला आहे.

विशेष न्यायाधीश जी.बी. गुराव यांनी गुरुवारी चक्रवर्तीचे यांचे वकील आणि विशेष खटल्यातील विशेष सरकारी वकील यांचे युक्तिवाद ऐकले. न्यायाधीशांनी या प्रकरणातील अन्य चार आरोपींच्या जामीन याचिकांवर सुनावणी केली. त्यानंतर कोर्टाने खटला शुक्रवारपर्यंत तहकूब केला.

मंगळवारी तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाला एनसीबीने अटक केली. शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना गेल्या आठवड्यात एजन्सीने अटक केली होती.