Riya Chakraborty's brother Shauvik Chakraborty gets bail

४ सप्टेंबर रोजी शौविकला (Shauvik Chakraborty ) अटक झाल्यानंतर तो सप्टेंबरपासून तुरुंगात होता. शौविकच्या अटकेनंतर रियाला (Riya Chakraborty) अटकही झाली होती. यापूर्वी कोर्टाने शौविकच्या जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्रा रियाला जामीन मंजूर झाला.

मुंबई : रिया चक्रवर्तीचा (Riya Chakraborty) भाऊ शौविक चक्रव्रतीला  (Shauvik Chakraborty ) बुधवारी विशेष एनडीपीसी न्यायालायत जामीन मिळाला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या वेळी समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात ( drug case) एनसीबीने (NCB) केलेलेल्या चौकशीत शौविकचे नाव समोर आले होते. या प्रकरणात एनसीबीला शौविकचे काही ड्रग्ज पेडलर्सशी (Drug peddler) संबंध असल्याचा पुरावा मिळाला होता. यानंतर शौविकला अटक करण्यात आली होती.

४ सप्टेंबर रोजी शौविकला अटक झाल्यानंतर तो सप्टेंबरपासून तुरुंगात होता. शौविकच्या अटकेनंतर रियाला अटकही झाली होती. यापूर्वी कोर्टाने शौविकच्या जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्रा रियाला जामीन मंजूर झाला.

शौविकने नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला गेत जामीन मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रकाशात एनसीबी अधिकाऱ्यांसमोर केलेल्या वक्तव्यांच्या कबुलीजबाब मानला जाऊ शकत नाही. असे सांगत शौविकच्या कायदेशीर वकिलाने असे म्हटले आहे की २४ वर्षाच्या मुलाला तुरुंगात ठेवण्यात काही अर्थ नाही आहे.