rhea chakraborty

रिया चक्रवर्ती यांना ८ सप्टेंबर रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती आणि २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रिया सध्या भायखळा कारागृहात शिक्षा भोगत आहे. यादरम्यान रिया आणि शौविकने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर २३ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

मुंबई: अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा (Rhea Chakraborty) न्यायालयीन कोठडीचा ( judicial custody) आज शेवटचा दिवस होता. परंतु ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ (judicial remand extended) करण्यात आली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू तपासात अमली पदार्थ (Drugs) प्रकरणात अटक झाली होती. तिची न्यायालायीन कोठडी आज संपणार होती. त्याचबरोबर रियाचा वकीलांनी रियाच्या आणि तिचा भावासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल (petition filed ) केली आहे. यापूर्वी रियाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता.