थोड्याच वेळात रियाची पुन्हा होणार चौकशी, ड्रग्ज घेतल्याचे केले कबुल, जाणून घ्या

तीने ड्रग्ज घेतल्याचे कबूल केले आहे. परंतु आपण ड्रग्जचे सेवन न केल्याचे सांगितले आहे. चौकशी दरम्यान रियाने सांगितले की मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये दिपेशकडून ड्रग्ज मागवले होते.

मुंबई : सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पुन्हा एकदा अभिनेत्री रिया चक्रवर्ती (रिया कॅक्रवर्ती) हीला चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीने आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचे घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत ते जैद विलात्र, बासित परिहार, कैझान इब्राहिम, अब्बास लखानी आणि करण अरोरा यांना अटक केली आहे.

रविवारी एनसीबीने रियाची केली ६ तास चौकशी, ड्रग्ज घेतल्याची कबुली

काल (रविवार दि. ६ सप्टेंबर २०२०) एनसीबीने केलेल्या चौकशीत रियाला रडू ढसाढसा रडू लागली होती. तीने ड्रग्ज घेतल्याचे कबूल केले आहे. परंतु आपण ड्रग्जचे सेवन न केल्याचे सांगितले आहे. चौकशी दरम्यान रियाने सांगितले की मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये दिपेशकडून ड्रग्ज मागवले होते. रियाची तिचा भाऊ शौविकला समोर बसवून चौकशी करण्यात आली आणि नंतर सॅम्युअल मिरांडा याच्या समोर बसवूनही चौकशी करण्यात आली यावेळी रियाला तु ड्रग्ज घेतलेस का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रियाने नाही असे उत्तर दिले. फक्त सिगारेट ओढत असल्याचे रियाने सांगितले.

परंतु रियाने हे कबूल केले की ती ड्रग्ज डिलर बासिद परिहारशी ती पाच वेळा भेटली होती. त्यांची भेट शुटींगच्या निमित्त झाली होती. सुशांत नैराश्यग्रस्त झाला होता. तो सिनेमाच्या शुटिंगदरम्यान ड्रग्ज घेत होता. अशी माहिती रियाने दिली.

रियाने या प्रकरणात मोठ्या व्यक्तीचा देखील उल्लेख केला आहे. परंतु एनसीबीने या व्यक्तीचे नाव अद्याप सांगितले नाही आहे. तिने सांगितले की सुशांत ड्रग्जच्या आहारी गेला होता. त्याच्या फार्महाऊसवर अनेक पार्ट्या झाल्या आहेत. यामध्ये छोट्या कलाकारांपासून ते मोठे कलाकार ड्रग्ज घेत होते. असा खुलासा रियाने केला आहे.