सुशांतच्या बहिणीविरोधात रियाची तक्रार

मुंबई : सध्या सीबीआय सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना ड्रग्जचे धागेदोरे मिळाले आहेत. त्यामुळे एनसीबीसुद्धा चौकशी करत आहे. यामध्ये रियाचा भाऊ शौविक यालाही अटक झाली आहे. आता रियाने सुशांतची बहीण प्रियांकासह इतर काही लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रियाने या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली आहे.

रियाने सुशांतची बहीण प्रियांका सिंह आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतर लोकांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केल्यामुळे तिने ही तक्रार दाखल केली आहे. रियाने फसवणूक, एनडीपीएस अॅक्ट आणि टेली मेडिसिन प्रक्टिस गाइडलाइन्स  अंतर्गत ही तक्रार केली आहे.

दरम्यान, वकील विकास सिंह यांनी असे म्हटले आहे की, सुशांत प्रकरणी कोणतीही तक्रार सीबीआयकडे दिली जावी. रियाची तक्रार मुंबई पोलिसांना कार्यरत ठेवण्यासाठीचे षडयंत्र आहे.या तक्रारीला काही अर्थ नाही.