मुलाच्या अटकेनंतर रियाच्या वडीलांनी दिली पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले अभिनंदन इंडिया….

रियाचा भाऊ शौविकला अटक झाल्यानंर वडिल इंद्रजित चक्रवर्ती यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अभिनंदन इंडिया, तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली, नक्कीच या रांगेत पुढचा नंबर माझ्या मुलीचा असेल.

मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला २ महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला परंतु त्याच्या मृत्यूचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी सीबीआय आणि एनसीबी ही तपास करत आहे. नारकोटिक कंट्रोल ब्युरोला या प्रकरणात ड्रग्ज बाबत काही पुरावे हाती लागले आहेत. या पुराव्यामुळे रियाचा भाऊ शौविक याला आणि सॅम्युअल मिरांडाला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी ६ सप्टेंबरला रियाला हजर राहण्यास सांगितले आहे.

रियाचा भाऊ शौविकला अटक झाल्यानंर वडील इंद्रजित चक्रवर्ती यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अभिनंदन इंडिया, तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली, नक्कीच या रांगेत पुढचा नंबर माझ्या मुलीचा असेल. त्यानंतर माहित नाही आणखी कोण कोण असेल. तुम्ही परिणामकारकपणे एक मध्यमवर्गीय कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. मात्र न्यायासाठी सर्व योग्य आहे. असा संदेश लिहिला आहे. याखाली लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती आणि कंसात निवृत्त असे लिहिले आहे.