२७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शालेय शुल्‍क कमी केल्याबद्दल पालकांतर्फे आर.के. फाऊंडेशनचा सत्कार

आर.के. फाऊंडेशन-जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, उरण यांना ‘सन्‍मान पत्र’ प्राप्त झाले कि पालकांनी फी कमी करण्याच्या विनंती केली होती व या विनंतीला व्यवस्थापनाने योग्य प्रतिसाद दिला.

  मुंबई : पालक शिक्षक संघटना (पीटीए) सदस्यांनी शास्त्रीय फी संबंधित पालकांच्या प्रश्नांची दखल घेण्याच्या प्रयत्नांसाठी रुस्तमजी केरावाला फाऊंडेशन द्वारा संचालित-जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय (आरकेएफ-जेएनपीव्ही) व्यवस्थापन यांचा सत्कार केला. त्यांनी ‘one-time’ आर्थिक सवलत देऊन शाळेतील २,७२२ विदयार्थ्यांची भरीव रक्कम कमी केली आहे, यासाठी सदस्यांनी व्‍यवस्‍थापनाचे आभार मानले आहेत.

  किरण घरत, अध्यक्ष, पीटीए,विकास कडू आणि श्रीमती रेखा ठाकूर, (दोन्ही उपाध्यक्ष, पीटीए) आणि पीटीएचे सचिव रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात पालक शिक्षक संघटनेने आरकेएफ-जेएनपीव्ही, शैक्षणिक ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष हरीश रावल आणि मनोज सावळे, प्राचार्य, आरकेएफ-जेएनपीव्ही यांना लॉकडाऊनदरम्यान पालकांना होणारी आर्थिक अडचण विचारात घेतल्याबद्दल आणि पालकांना शालेय शुल्कामधे कमी केल्‍या बद्दल आभार प्रकट केले आहेत.

  आरकेएफ-जेएनपीव्ही विदयालय हे सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून रुस्तमजी केरावाला फाऊंडेशन आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टद्वारे संचालित आणि व्यवस्थापित केले जाते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान उपयोगिता, मूल्य-आधारित समाकलित शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये विकासात्मक कौशल्य प्रस्थापित करण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांच्या निरंतर विकासात्मक उद्दिष्टे ४ (युएन एसडीजी ४) शी सुसंगत राहून आगामी शैक्षणिक वर्षासाठी विस्तृत आदेश जारी केले आहे.

  लॉकडाऊन दरम्यान आरकेएफ-जेएनपीव्हीने लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन सत्रे, शिक्षकांना प्रशिक्षण देऊन आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमित मूल्यांकन करुन शिक्षणामध्ये सातत्य सुनिश्चित केले. या हस्तक्षेपाच्या परिणामी शाळा पुन्हा सुरू सुरू करण्यास मदत झाली.

  आरकेएफ-जेएनपीव्हीचे शैक्षणिक ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष हरीश रावळ म्हणाले, “लॉकडाऊन दरम्यान पालकांकडून होणारा आर्थिक भार आम्हाला समजतो आणि आम्‍ही प्रत्येक पालकांच्या पाठीशी उभे आहोत. हा सन्मान प्रदान केल्याबद्दल आम्ही आरकेएफ-जेएनपीव्ही पालक शिक्षक संघटनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो आणि तंत्रज्ञानाद्वारे संस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या आमच्या बांधिलकीची पुनरावृत्ती करू इच्छितो. त्याचबरोबर बालपणात पायाभूत स्तंभ तयार करणे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनकाळात मदत करणे हे आमचे ध्येय आहे.”

  पीटीएचे अध्यक्ष किरण घरत म्हणाले, “आमच्या आर्थिक समस्या समजून घेण्यासाठी आर. के. फाऊंडेशनने घेतलेल्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो कारण गेल्या वर्षी कोविड-१९ साथीने पालकांवर खूप परिणाम झाला होता. पालक शिक्षक संघटनेने शालेय शुल्कामध्‍ये ४० टक्के सवलत दिल्‍याबद्दल आर.के. फाऊंडेशनचे कौतुक केले आहे व ही बाब पालक आणि विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल अशी आशा व्‍यक्‍त केली आहे.”

  आरकेएफ-जेएनपीव्हीचे प्रार्चाय मनोज सावळे म्हणाले, “पालक शिक्षक संघटनेने दिलेल्या पाठबळाचे आम्ही फार कौतुक करतो जे उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यास आणि आपल्या विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील कौशल्ये देण्याच्या आमची वचनबद्धता दृढ करेल. आरकेएफ-जेएनपीव्हीचा दृष्टिकोण सर्व भावी दृष्टिकोणासह सर्वसमावेशक शिक्षण आणि विकासावर केंद्रित आहे. आमचे लक्ष सर्वांगीण विकास आणि सर्वांगिण शिक्षणाकडे असेल ज्यामुळे संस्थेला पुढील पिढीचे उज्ज्वल भविष्‍य घडविता येईल.”