पाणी साचले की रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प; नालेसफाईवर पाच वर्षांत ७०० कोटी खर्च फुकट

मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडतात. मुंबईत पाणी साचले की रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होते. पाणी साचल्यावर नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप महापालिका आणि सत्ताधाऱ्यांवर केले जातात. दरवर्षी महापालिकेकडून नालेसफाईवर शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च केले जातात. गेल्या पाच वर्षांत सुमारे सातशे कोटींहून अधिक रक्कम नालेसफाईवर खर्च करण्यात आली आहे. हा केलेला खर्च फुकट गेल्याचे दिसत आहे.

    मुंबई : मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडतात. मुंबईत पाणी साचले की रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होते. पाणी साचल्यावर नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप महापालिका आणि सत्ताधाऱ्यांवर केले जातात. दरवर्षी महापालिकेकडून नालेसफाईवर शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च केले जातात. गेल्या पाच वर्षांत सुमारे सातशे कोटींहून अधिक रक्कम नालेसफाईवर खर्च करण्यात आली आहे. हा केलेला खर्च फुकट गेल्याचे दिसत आहे.

    यावर्षी संपूर्ण मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदीमधील गाळ काढण्यासाठी १३२ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. २०१८ मध्ये असलेल्या खर्चानुसार ही रक्कम ठरवण्यात आली आहे. दरवर्षी नालेसफाईवर करण्यात येणारा खरच पाहता मुंबईत महापालिकेकडून गेल्या पाच वर्षांत सुमारे ७०० कोटी रुपये नालेसफाईवर खर्च करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी मुंबईत कोरोनाचा प्रसार असताना कामगार गावाला गेल्याने नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नव्हती. यामुळे गेल्यावर्षी मुंबईत पाणी साचले होते.

    यंदाही कोरोनाची दुसरी लाट असताना नालेसफाई करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, हा दावा गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसादरम्यान फोल असल्याचे समोर आले आहे. बुधवारी ९ जून आणि शनिवारी १२ जून या दोन्ही दिवसांत पाऊस पडल्याने मुंबईची तुंबई झाली होती.

    मुंबईची तुंबई झाल्याने हिंदमाता, किंग सर्कल, सायन, कुर्ला, अंधेरी सबवे, बांद्रा आदी विभागात पाणी साचते. त्याचा परिणाम मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर होऊन वाहतूक ठप्प होते. तसेच, सायन आणि कुर्ला, चुनाभट्टी आदी रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प होते. याचा परिणाम म्हणून मुंबई ठप्प होऊन त्याचा त्रास सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागतो.