Prices of N-95 masks are likely to rise
एन-९५ मास्क

मागील २ महिन्यांत व्हीनस आणि मॅग्नम या दोन मास्क निर्मात्या कंपन्यांनी तब्बल २०० कोटींचा आर्थिक नफा मिळवला आहे. अशी धक्कादायक माहिती समितीच्या अहवालातून समोर आली आहे.

मुंबई : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) राज्यात कोरोना विषाणूची (Corona Virus) नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सरकारने मास्क (Face Mask) अनिवार्य केला आहे. परंतु मास्क बनवणाऱ्या दोन बड्या कंपन्यांनी राज्य सरकार आणि नागरिकांची लूट केली आहे. सरकार आणि जनतेला कोट्यावधी रुपयांना लटून गंडा घातला आहे.

मागील २ महिन्यांत व्हीनस आणि मॅग्नम या दोन मास्क निर्मात्या कंपन्यांनी तब्बल २०० कोटींचा आर्थिक नफा मिळवला आहे. अशी धक्कादायक माहिती समितीच्या अहवालातून समोर आली आहे.

याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चार सदस्यीय समिती नेमली. समितीचा अहवाल मंगळवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना सादर करण्यात आला. नागरिकांनी व्हॉल्व असलेले एन-९५ मास्क वापरू नये अशी शिफारसही समितीने केली आहे.

समितीने केलेल्या शिफारशी खालीलप्रमाणे आहेत.

समितीच्या शिफारसी
निर्धारित किमतीमध्ये उत्पादन खर्च आणि इतर सर्व घटक समाविष्ट.
मास्क उत्पादक कंपन्या, घाऊक व किरकोळ विक्रे ते यांनी मास्कची विक्री किंमत दर्शनी भागात लावावी
साथरोग कायदा १८९९ च्या तरतुदी लागू असेपर्यंत हे दरही लागू
किमतीच्या तक्रार निवारणासाठी राज्य स्तरावर आयुक्त, अन्न व प्रशासन तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नेमावे.
मास्क उत्पादक कंपन्या उत्पादन बंद करण्याची परिस्थिती निर्माण करीत असतील तर योग्य त्या उपाययोजना शासनाने कराव्यात.
थेट आरोग्य सेवा देणाºया संस्थांना कंपन्यांनी त्यांचे उत्पादन विक्री चालू ठेवण्याबाबत सूचना द्याव्यात.
थेट विक्री करताना त्याचा भाव कमाल विक्री किमतीच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
आरोग्य सेवा-सुविधा देण्याऱ्या संस्थांनी त्यांनी खरेदी केलेल्या किमतीच्या ११० टक्क्यांहून अधिक किंमत आकारू नये.

मास्कचे नाव सध्या सुचवलेली किंमत
एन-९५, व्ही शेप १३५ १९
एन-९५, थ्री डी १३५ २५
एन-९५, विदाउट व्हॉल्व्ह ९५ २८
एन-९५, एम-एच कप १३५ ४९
सीएन-९५+एन-९५ कप १०५ २९
(विदाउट व्हॉल्व्ह)
७१३ डब्ल्यू-एन-९५-६डब्ल्यूई १३० ३७
(कप, विदाउट व्हॉल्व्ह)
७२३ डब्ल्यू-एन-९५-६आरई १३० २९
(कप शेप विदाउट व्हॉल्व्ह)
आयएसआय प्रमाणित १४० १२
एफएफपी-२ मास्क
२ प्ला सर्जिकल विथ १० ०३
लूप ऑर टाय
थ्री प्लाय सर्जिकल १६ ०४
विथ मेल्ट
डॉक्टर किट ५ एन-९५ ४७५ १२७
+५ थ्री लेअर ब्लोन मास्क