हे बरं आहे ! पूर्वी हिंदुहृदयसम्राट, आता फक्त उद्धव ठाकरेंचे वडील? रोहित पवारांचा भातखळकरांना टोला

कोरोना काळातही नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्याला भातखळकरांनी प्रत्युत्तर देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख उद्धव ठाकरेंचे वडील असा केला. त्यावर आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी उत्तर दिलंय. 

    महाराष्ट्राच्या राजकारणातील  सत्तेची समीकरणं बदलल्यापासून शिवसेना आणि भाजप हे एकेकाळचे मित्रपक्ष आता एकमेकांवर तोंडसुख घेण्यासाठी टपून असल्याचं चित्र दिसतं. त्यात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जोडीला शिवसेना आल्यामुळे या राजकीय टोमणेबाजीत चांगलीच भऱ पडल्याचं चित्र दिसतंय.

    कोरोना काळातही नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्याला भातखळकरांनी प्रत्युत्तर देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख उद्धव ठाकरेंचे वडील असा केला. त्यावर आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी उत्तर दिलंय.

    जेव्हा भाजप शिवसेनेच्या सोबतीने सत्तेत होता, तेव्हा भाजकडून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख होत होता. आता मात्र त्यांचाच  उल्लेख उद्धव ठाकरेंचे वडील एवढाच केला जातोय, असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप रोहित पवारांनी केलाय.

    कोरोना काळात सगळे स्त्रोत कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीची आरोग्यव्यवस्था मजबूत करण्यासाठी खर्च करण्याऐवजी संसदेचं बांधकाम का सुरू ठेवण्यात आलंय, असा सवाल रोहित पवारांनी केलाय. त्यावरून हा कलगीतुरा रंगला आहे. कोरोनाच्या संकटकाळात कामगारांना ओढून आणून काम सुरू ठेवणं चुकीचं असल्याचं रोहित पवार म्हणालेत.