रोहित पवारांनी घेतली प्रविण दरेकरांची भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाला उधान आलं आहे. मात्र या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाला उधान आलं आहे. मात्र या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. प्रविण दरेकर यांच्या अवंती या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली आहे. यावेळी प्रविण दरेकर यांनी रोहित पवार यांना लेखाजोखा हे पुस्तक भेट दिलं आहे.

    रोहित पवार नेहमीच विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतात. पण विविध प्रश्नावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

    मुंबई पोलीस दलात फेरबदल करण्याची ठाकरे सरकारवर वेळ आली आहे. ठाकरे सरकारने पोलीस दलात बाजार मांडला आहे. अशी टीका दरेकर यांनी केली आहे. अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.