ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते, खडसेंचं स्वागत करत रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर भाजपला (BJP) रामराम ठोकाला आहे. तसेच त्यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करण्यावर अनेक राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे यांच्या घोषणेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी खडसेंचं स्वागत (Welcome) भाजपवर निशाणा (attacks) साधला आहे.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर भाजपला (BJP) रामराम ठोकाला आहे. तसेच त्यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करण्यावर अनेक राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे यांच्या घोषणेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी खडसेंचं स्वागत (Welcome) भाजपवर निशाणा (attacks) साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते, वेलकम खडसे साहेब’ असं म्हणत रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपला टोला लगावला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचं आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा जयंत पाटील यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडतोय

भाजप पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे, देवेंद्र फडणवीस हेच आहे. त्यांच्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत. ते जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता. पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला.