खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच, रोहित पवारांनी ट्विट करत केला व्हिडिओ शेअर

पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

    भाजपाचे नेते पेट्रोलवर दरवाढसाठी राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवार) पुण्यात बोलतांना केली होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

    हे हास्यास्पद विधान असल्याचे रोहीत पवार म्हणाले. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

    रोहीत पवार यांनी खोटं काय आणि वस्तुस्थिती सांगणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.