rohit pawars push bjp corporators join ncp
रोहित पवार यांचा भाजपला धक्का

पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi) व प्रियंका गांधी (priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) अडवून ताब्यात घेतले होते. या संपूर्ण प्रकरणावर उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय! अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशातील (UP)  हाथरस  (Hathras) येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय (Politician) आणि बॉलिवूड (Bollywood Actress)  कलाकारांमधून संतप्त प्रतिक्रिया (Raction) येताना दिसत आहेत. अशातच काल पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi) व प्रियंका गांधी (priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) अडवून ताब्यात घेतले होते. या संपूर्ण प्रकरणावर उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय! अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून लिहिले की, ‘उत्तरप्रदेशात मीडियाला रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय! यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही?आणखी किती दिवस गप्प बसणार? की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय?’

आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख अभिनेत्री कंगना रणौत तिच्याकडे असल्याचं दिसतंय. कंगनाने गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई व महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावेळी तिने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर चौफेर टीका झाली होती. अशातच आता रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.