मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडच्या कामात १६०० कोटींचा भ्रष्टाचार; आशिष शेलारांचा शिवसेनेवर गंभीर आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणा-या कोष्टल रोडच्या(Coastal Road project) कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कंन्टल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे, आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा भाजपा आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

  मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणा-या कोष्टल रोडच्या(Coastal Road project) कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कंन्टल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे, आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा भाजपा आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

  तर, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्याप्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा अशी विनंतही शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कोस्टलरोड मधील भ्रष्टाचार उघड केला. यापुर्वी त्यांनी ६ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोडच्या कामात १००० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याला तातडीने त्याच दिवशी मंबई महापालिकेने खुलासा करून उत्तर दिले होते.

  या खुलाशामध्ये महापालिकेने, या कामात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार व अनियमीतता न झाल्याचा दावा केला होता. त्यावर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आमदार आशिष शेलार यांनी पुराव्यासहित या कामात कसा भ्रष्टाचार होतोय हे उघड केले.

  याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोस्टल रोड हा भाजपाचा ड्रिम प्रकल्प असून मुंबईला त्याची गरज आहे म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या. त्यानंतर मात्र ज्या पध्दतीने काम सुरू आहे त्यावरून कामाचा दर्जा निष्कृष्ट दर्जाचे असून या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे असे सांगत त्यांनी आजची पत्रकार परिषद घेतली.

  मुंबई महापालिकेतील सत्ताधारी गेले अनेक वर्षे मुंबईतील गल्लीतील रस्त्यांचे डांबरिकरण करून कटकमिशनचा व्यवहार करत आहेत. तीच कार्यपध्दती याच आंतराष्ट्रीय प्रकल्पाच्या बाबतीत सत्ताधा-यांची असूश प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून प्रकल्पासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. “हे काय तुम्ही करून दाखवताय?” असा सवालही त्यांनी केला. ही अशीच कार्यपध्दती राहली तर मुंबईकरांच्या १४ हजार कोटी गेले वाहून असे होईल की काय अशी भिती वाटते आहे. हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे. हा प्रकल्प व्हावा अशीच भाजपाची भूमिका असून हा विषय शिवसेनेने प्रितष्ठेचा न करता प्रकल्प योग्य दर्जाचा व्हावा म्हणून यात होणा-या चुका आम्ही दाखवून देत असून त्या वेळीच सुधाराव्या असे आवाहनही आमदार आशिष शेलार यांनी केले.

  या प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते बरोडा पँलेस या पँकेज १ या कामाबाबत डिसेंबर २०१९ ते २०२० या कालावधीत एका वर्षातील भ्रष्टाचार आणि अपव्यवहाराचे पुरावे सादार करीत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, या प्रकल्पाला कायदेशीर पध्दतीने काम करण्यासाठी मुुंबई महापालीकेच्या स्थायी समितीने दोन कंन्सल्टन नियुक्ती केली असून ए.ई. काँम या कंपनीची जनरल कन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली असून लुईस बर्गर यांना प्रकल्प कंन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या दोन कंपन्यानाला ६०० कोटी रुपये देण्याचे स्थायी समितीने मंजूर केले आहे. महापालिकेला या दोघांनी सल्लामसलत करून काम योग्य दिशेने होईल तसेच ठेकेदाराकडून योग्य दर्जाचे काम होईल यासाठी या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती.