Rs 2,000 crore heroin seized from JNPT; Two accused arrested from Madhya Pradesh

डीआरआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभजीत सिंहची कोट्यावधींची हिरोईन ड्रग्जचे कन्साईमेंट मागवण्यात महत्त्वाची भूमिका होती. नियोजनानुसार प्रभजीत आणि त्याच्या दोन साथीदारांनी इंटरनॅशनल सिंडिकेटशी संबंध प्रस्तापित करून कोट्यवधींचे ड्रग्ज टेल्कम पाऊडर स्टोन असल्याचे भासवत मुंबईत आणण्याचे प्लॅनिंग केले. त्यानुसार इरणहून जेएनपीटीच्या बंदरात कंटेनर दाखल झाला. हा कंटेनर जेएनपीटी येथून निघून थेट पंबाजमधील तरण तारणमध्ये डिलिव्हर होणार होता. गेल्यावेळेस पंबाजच्या सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवल्यामुळे या ड्रग्जची तस्करी होणे शक्य नव्हते.

    मुंबई : महसुल गुप्त संचलनालयाने (डीआरआय) अफगानिस्तानमधून तस्करी करून नवी मुंबईत आणलेले सुमारे २९३.८१ किलोचे हिरोईन ड्रग्ज जप्त केले असून याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुमारे २ हजार कोटी किंमत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या मािहतीनुसार, इराणहून महाराष्ट्रातील उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) आलेल्या कंटेनरमधून हिरोईनला टेलकम पाऊडर स्टोन असल्याचे सांगत आयात करणाऱ्या संधू एस्कपोर्ट कंपनीचा मालक प्रभजीत सिंह याला पंजाबमधून अटक करून पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ जुलैपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली आहे. त्याचप्रमाणे डीआरआयने त्याच्या इतर दोन आरोपींना मध्य प्रदेशमधून अटक केली आहे.

    डीआरआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभजीत सिंहची कोट्यावधींची हिरोईन ड्रग्जचे कन्साईमेंट मागवण्यात महत्त्वाची भूमिका होती. नियोजनानुसार प्रभजीत आणि त्याच्या दोन साथीदारांनी इंटरनॅशनल सिंडिकेटशी संबंध प्रस्तापित करून कोट्यवधींचे ड्रग्ज टेल्कम पाऊडर स्टोन असल्याचे भासवत मुंबईत आणण्याचे प्लॅनिंग केले. त्यानुसार इरणहून जेएनपीटीच्या बंदरात कंटेनर दाखल झाला. हा कंटेनर जेएनपीटी येथून निघून थेट पंबाजमधील तरण तारणमध्ये डिलिव्हर होणार होता. गेल्यावेळेस पंबाजच्या सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवल्यामुळे या ड्रग्जची तस्करी होणे शक्य नव्हते.

    मुंबई सीमा शुल्क विभाग आणि डीआरआयने १ हजार कोटींचे १९१ किलो हिरोईल गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जप्त केली होती. ही हिरोईन आयुर्वेदिक औषधे असल्याचे भासवून आणली होती. हे ड्रग्ज देखील अफगानिस्तानमधून जेएनपीटी येथे मालवाहतूक जहाजाने आले होते.