The risk of corona is increasing; Mumbai Airport Terminal 1 will be closed again

मुंबई विमानतळावर(Mumbai Airport) येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक(RTPCR Test Compulsory For International Passengers) करण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

    मुंबई :कोरोनाचा(Corona) नवा विषाणू आढळल्याने मुंबई महापालिका(BMC) सतर्क झाली आहे. यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून मुंबई विमानतळावर(Mumbai Airport) येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक(RTPCR Test Compulsory For International Passengers) करण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे. येत्या ३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून हा नियम लागू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

    कोविड विषाणूचे नवीन प्रकार वेगाने फैलावत असल्याने केंद्र सरकारने, भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मुंबईत विमानाने येणाऱ्या आंतराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. जे आंतरराष्ट्रीय प्रवासी यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून विमान प्रवास करून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील, त्या सर्व प्रवाशांना स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. ३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून हा नियम लागू होणार आहे.

    सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, विमान प्रवास करुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची तरतूद रद्द करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.