कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरमसाठी नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीस परवानगी नाही

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस. स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या कालावधीत काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे नियमावलीत म्हटले आहे.

मुंबई : सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरमसाठी नियमावली जाहीर केली आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी इतर सणांसारखेच मोहरमही साध्या पद्धतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. असी सूचना सरकारने दिल्या आहेत. 

मातम मिरवणूक – कोरोना काळात इतर धार्मिक कार्यक्रमांसाखेच आपापल्या घरात राहून दुखावटा पाण्यात यावा, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून  धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देण्यात येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. 

वाझ/माजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. 

ताजिया/आलम-ताजिया/आलम या कार्यक्रमांना परवानगी देता येणार नाही. तसेच ताजिया/आलम घरीच/घराशेजारी बसवून तेथेच शांत/विसर्जन करण्यात यावे.

सबील/छबील-सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू. नये सदर ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करावे. सबली असेल त्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात यावे. 

सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमात ४ पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. 

कोविड-१९ च्या परिस्थितीवर विचार करता आणि रक्तदान शिबीरे, प्लाज्मा शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच कोरोना आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. 