मुंबईत लॉकडाऊन सारखे नियम लागू; पण, लोकलबाबत…

राज्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यापाठोपाठ सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील निर्बंध कठोर करण्यासंदर्भात भूमिका मांडली. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण जनतेने नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन टोपेंनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या अंशत: लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

    मुंबई : मुंबई, नागपूरसह संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला नसला तरी कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, लोकलबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

    राज्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यापाठोपाठ सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील निर्बंध कठोर करण्यासंदर्भात भूमिका मांडली. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण जनतेने नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन टोपेंनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या अंशत: लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी निर्बंध घातले आहेत. याचाच एक भाग म्हणून, मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी आता मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलवण्यात येणार असून तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
    मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. लोकलमधील गर्दीमुळे ही संख्या अधिक वाढताना दिसत आहे.

    त्यामुळे मंत्रालयात शिफ्टची वेळ बदलण्यात आली होती. मंत्रालयात एका शिफ्ट ऐवजी दोन शिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही मंत्रालयातील गर्दी कमी होताना दिसत नसल्याने अखेर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कामावर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    सर्व कार्यालयात ५० टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास कार्यालये बंद केली जाणार आहेत. मंदिरे, प्रार्थनास्थळी दर तासाला किती भाविक येतील, याकडे संबंधित ट्रस्टने लक्ष द्यावे. अशा सल्लाही देण्यात आला आहे.