Rumors of getting free land in Vikhroli, a large crowd of citizens, what is the matter?

विक्रोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी अफवा पसरली की १०० एकर जागा असलेल्या मालकाचा मृत्यू झाला आहे आणि त्यांची मुलगी गरिबांना जमीन वाटप करीत आहे. असेही म्हटले होते की ज्यांनी जमिनीवर अतिक्रमण केले आहे त्यांना मोफत जमीन दिली जात आहे.

विक्रोळी : मुंबईतील विक्रोळीमध्ये (Vikhroli) सोमवारी मोफत जमीन मिळण्याची अफवा (Rumors of getting free land in Vikhroli) वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच लोकांचा मोठा लोंढा तिथे पोहचला. ही जमीन रिकामी असून विक्रोळीमध्ये आहे. काही लोकांनी जमिन मिळवण्यासाठी आपापल्या सोयीने जमीनीवर तंबू ठोकले होते. यानंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना अनेक विनंत्या करत सांगितले की ही अफवा असून कोणालाही मोफत जमीन दिली जात नाही आहे. तसेच ही जमीन सरकारी मालकीची आहे. तरीही काही लोकं तिथून हलण्यास तयार नव्हते.

वाऱ्यासारखी पसरली अफवा

विक्रोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी अफवा पसरली की १०० एकर जागा असलेल्या मालकाचा मृत्यू झाला आहे आणि त्यांची मुलगी गरिबांना जमीन वाटप करीत आहे. असेही म्हटले होते की ज्यांनी जमिनीवर अतिक्रमण केले आहे त्यांना मोफत जमीन दिली जात आहे. ही सरकारी जमीन असल्याचे एखाद्याने खोडसाळ केल्याची अफवा तपासात उघडकीस आली आहे. घटनेचा व्हिडीओ असूनही पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

विक्रोळी पोलिसांनी ४००-६०० चौरस फूट व्यापलेल्या पालिकेच्या कर्मचार्‍यांसह काही अतिक्रमणे हटविली. तथापि, काही लोक अद्याप जमीन मिळण्याच्या आशेने या क्षेत्राबाहेर जाण्यास तयार नाहीत. स्थानिक शिवसेनेचे आमदार सुनील राऊत म्हणाले की, आम्ही लोकांना सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्यास परवानगी देऊ शकत नाही. त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले आहे. तपासात असे दिसून आले आहे की लोकांनी स्वत: साठी ३०० ते ४०० चौरस फूट क्षेत्र व्यापले आहे.