नागपूरमधील मनोरूग्णाच्या दूरध्वनीने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा; अनेक तास शोध मोहिम घेत यंत्रणाची तत्परता!

दुपारी साडेबाराच्या सुमारास राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात रविवारच्या सुटीच्या दिवशी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या, वेगाने तपास कामाला लागल्या होत्या. काहीवेळानंतर नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केल्याची आणि हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.   

    मुंबई : कोरोनामुळे मोजकेच कर्मचारी सध्या असतात. त्यात रविवार असल्याने मंत्रालयात लोकांची अगदी कमी वर्दळ होती. अश्यावेळी मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये अनेक तास शोध मोहिम (सर्च ऑपरेशन) घेण्यात आली. श्वान पथकाने मंत्रालयाच कोपरान कोपरा पिंजून  संभाव्य बॉम्बचा शोध घेतला. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. त्यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

    नागपूरमधील तरुणाने दूरध्वनी केला
    दुपारी साडेबाराच्या सुमारास राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात रविवारच्या सुटीच्या दिवशी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या, वेगाने तपास कामाला लागल्या होत्या. काहीवेळानंतर नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केल्याची आणि हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

    आत्मदहनाचा इशारा दिला होता
    याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सागर काशिनाथ मन्द्रे याने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याबाबत फोन केला आहे. सागर काशिनाथ मन्द्रे याने यापूर्वी १२ फेब्रु.२०२० रोजी महसूल विभागाचे सचिव यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतू त्याचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. मंत्रालय आणि परिसराची तपासणी केली असता काहीही आढळले नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहेत. काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, सर्च ऑपरेशन जवळपास थांबले आहे. पोलीस सागर मेन्द्रे विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करणार आहेत.
     
    कोणतीही स्फोटके सापडली नाहीत
    मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली . मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सर्च ऑपरेशन डॉग स्क्वाडच्या माध्यमातून करण्यात आले. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य यंत्रणांचे प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते