लोकल ट्रेन चालवा,गरिबाला जगवा – जनता दल

गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या लॉक डाऊन मुळे गरिबांची रोजी रोटी संपुष्टात आली असून लोकल बंद असल्यामुळे गरिबांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.वसई विरार,पालघर,कर्जत,कसारा इथून मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या महिलांना रोजगार गमवावा लागत आहे.त्यांच्या चुली पेटाव्यात म्हणून तरी महिलांसाठी दिवसातील किमान दोन चार तास लोकल ट्रेन खुली करावी अशी आग्रही भूमिका ज्योती बडेकर यांनी मांडली.

    मुंबई : राज्य सरकारने गरिबांसाठी लोकल ट्रेन खुली करून गरिबांना जगण्यासाठी आधार द्यावा म्हणून आज जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने चर्चगेट येथील पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार जागरण आंदोलन करण्यात आले. ही केवळ सुरवात असून सरकारने गरिबांची मागणी मान्य न केल्यास गरीब वस्त्यांमधून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवि भिलाणे यांनी दिला आहे.

    आज पक्ष कार्यालयाच्या आवारात झालेल्या या आंदोलनात बोलताना प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील म्हणाले की सरकारने लॉक डाउनचं नियोजन करताना पैसेवाल्याना नव्हे तर गरिबांना आपल्या धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवावं.यावेळी पक्षाचे राज्य प्रधान महासचिव प्रताप होगाडे,मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर,मुंबई महासचिव ज्योती बडेकर,युवा जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे,संदेश गायकवाड,संजीवकुमार सदानंद,मतीन खान,अपर्णा दळवी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शंकर खिल्लारे,पोपट सातपुते,विक्रांत लव्हानडे,विद्यार्थी भारतीच्या मंजिरी धुरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.