शेतकरी कुटुंबात जन्म ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड, कसा आहे रुपाली चाकणकरांचा प्रवास

शेतकरी कुंटूबात जन्म ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असा प्रवास रुपाली चाकणकरांचा आहे. महाराष्ट्रातल्या एक आक्रमक नेत्या म्हणून रूपाली चाकणकर यांची ओळख आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर आता ठाकरे सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळं आता त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी नेहमी आक्रमक असणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा थक्क करणार प्रवास आहे. शेतकरी कुंटूबात जन्म ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असा प्रवास रुपाली चाकणकरांचा आहे. महाराष्ट्रातल्या एक आक्रमक नेत्या म्हणून रूपाली चाकणकर यांची ओळख आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर आता ठाकरे सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेले अनेक दिवस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सोपवण्यात आली आहे. त्यामुळं त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा केली जात आहे.

    शेतकरी कुटुंबात रूपाली चाकणकरांचा जन्म

    रूपाली चाकणकर यांचा जन्म दौंडमधील शेतकरी कुटुंबात झाला. पुण्यातील हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. तसेच त्यांचं पुढील शिक्षणासाह हडपसर येथे झाले. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. मागील दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होतं. विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकांना लक्षात घेता ही जागा लवकरच भरणार अशी चर्चा होती. यापूर्वी विजया रहाटकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळ हे पद रिक्य असल्यामुळं विरोधकांनी चांगलीच टिका केली होती.

    चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात वाद

    मुळच्या राष्ट्रवादी काँगेसच्या असलेल्या आणि आता भाजमध्ये असलेल्या चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद पाहयला मिळत आहे, रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या निवडीवरुन चित्रा वाघ यांनी मागील आठवड्यात बोचरी टिका केली होती. “रावणाची बहीण शूपर्णखा” असा रुपाली चाकणकर यांचा उल्लेख केला होता.  ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ त्या जागेवर बसवू नका. अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचंच नाक कापलं जाईल,’ असं वाघ यांनी घणाघाती टिका केली होती.

    प्रभावी कामाची छाप

    अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्यभरातील महिलांच्या हक्कासाठी न्याय मिळवून देणाऱ्या आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारा म्हणून रुपाली चाकणकर यांच्याकडे पाहिलं जात आहे. तो चेहरा म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर. रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत

    महिलांवर होणाऱ्या अन्यायांवर आक्रमक

    शेतकरी कुंटुबात जन्मलेल्या चाकणकर यांना सासरी राजकारणाचा वारसा मिळाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेललीय. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. आता महाविकास आघाडी सरकारने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिल्यामुळं रुपाली चाकणकर यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.