Rush to eat Pawar's birthday cake; Strong discussion of the video shared by Rane

कार्यक्रम संपताच केक खाण्यासाठी स्टेजवर झुंबड उडाली. अनेकजम या केकवर तुटून पडले. स्टेजवर केक खाण्यासाठी झालेली गर्दी पाहून आयोजकांनी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. निलेश राणे याचा व्हिडिओ शेअर करत या कार्यक्रमाच्या आयोजकांवर निशाणा साधला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या परळी मतदारसंघात एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. मात्र, हा कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर एकच गोंधळ उडाला होता. भाजप नेते निलेश राणे यांनी या घटनेनंतर एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडीओसह त्यांनी पोस्ट केलेल्या ट्विटवरुन सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

धनंजय मुंडेंनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी हजेरी लावली. पवारांच्या वाढदिवसासाठी ८१ किलोंचा केकही आणण्यात आला होता.

हा कार्यक्रम संपताच केक खाण्यासाठी स्टेजवर झुंबड उडाली. अनेकजम या केकवर तुटून पडले. स्टेजवर केक खाण्यासाठी झालेली गर्दी पाहून आयोजकांनी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. निलेश राणे याचा व्हिडिओ शेअर करत या कार्यक्रमाच्या आयोजकांवर निशाणा साधला आहे.

मन खचून गेलं हे पाहून… महाराष्ट्रात ६० वर्षामध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात, काहींना स्वतंत्र महाराष्ट्राचे जाणते राजे काही लोकं म्हणतात, त्या ६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती बघायला मिळते, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.