रशियातील ‘स्पुटनिक-व्ही’ लस मुंबईत दाखल; रात्री १० पर्यंत नागरिक घेऊ शकतील लस

काेराेनाच्या  तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता रशियन बनावटीची (The Russian-made) स्पुटनिक-व्ही लस (Sputnik-V vaccine) मुंबईत उपलब्ध झाली आहे. साेमवारी  घाटकोपर पश्चिम येथील झायनोव्हा शाल्बी रुग्णालयामध्ये (Zenova Shalbi Hospital) १०५ नागरिकांना ही स्पुटनिक व्ही लस देण्यात आली.

  मुंबई (Mumbai).  काेराेनाच्या  तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता रशियन बनावटीची (The Russian-made) स्पुटनिक-व्ही लस (Sputnik-V vaccine) मुंबईत उपलब्ध झाली आहे. साेमवारी  घाटकोपर पश्चिम येथील झायनोव्हा शाल्बी रुग्णालयामध्ये (Zenova Shalbi Hospital) १०५ नागरिकांना ही स्पुटनिक व्ही लस देण्यात आली. आज झायनोव्हा शाल्बी रुग्णालयामध्ये हार्दिक शहा यांना स्पुटनिक व्ही लस देऊन लसीकरणाला सुरुवात केली. स्पुटनिक- व्ही लस घेण्यासाठी आरोग्य सेतूवर (the health bridge Center) नोंद करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

  स्पुटनिक लसीची किंमत ११४५/-
  भारतात रशियाची स्पुटनिक व्ही कोरोना लसीचं उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करीत असून या एका लशीची किमंत ११४५/- आहे, १८ वर्षांवरील व्यक्ती ही लस घेऊ शकतात तसेच २१ दिवसांनी या लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.  झायनोव्हा  शाल्बी हॉस्पिटलमध्ये लस उपल्बध झाल्यामुळे कुर्ला ते मुलुंड येथे राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे  रुग्णालयाचे बिजिनेस डेव्हलपमेंट प्रमुख आशिष शर्मा म्हणाले.

  लस देताना सोशल डिस्टेंसिंगचे पालन आम्ही काटकोरपणे करीत असून शासनाने दिलेल्या इतर सूचना पाळत आहोत. झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये रात्री १० पर्यंत आम्ही लसीकरण सुरु ठेवणार असून यामुळे नोकरी करीत असलेल्या नागरिकांना लस घेणे सोपे पडेल असेही त्यांनी सांगितले.

  लस कधी व केव्हा उपलब्ध हाेणार?
  स्पुटनिक- व्ही लस घेण्यासाठी आरोग्य सेतूवर नोंद करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात अाले. ०२२- ६८९००००० या नंबरवर फोन करून नाव नोंदवू शकता. झायनोव्हा  शाल्बी हॉस्पिटलमध्ये इथे हे लसीकरण सकाळी ९ ते रात्री १०  वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

  काेराेना  विराेधातील जगभरातील पहिली लस
  रशियातील शास्त्रज्ञांनी ‘द लान्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात लशीच्या संशोधनाबाबतचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील दाव्यानुसार, रशियात लशीच्या ज्या सुरुवातीच्या चाचण्या झाल्या, त्यात लशीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे संकेत मिळाले आहेत. चाचणीत सहभागी झालेल्या ज्या ज्या लोकांवर लशीची चाचणी घेण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या.

  विशेष म्हणजे, या चाचणीमुळे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्स सुद्धा झाले नाहीत. असाही दावा रशियन शास्त्रज्ञांनी ‘द लान्सेट’मधील अहवालात केलाय. दोन बिलियन डोस हे पुढील पाच महिन्यांमध्ये भारताला उपलब्ध होणार असल्याची माहिती  केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी  रशियाने या लसीची नोंदणी केली होती म्हणजेच  कोरोना विरोधातली जगभरातली ही पहिली लस आहे.