‘नोकऱ्यांच्या नावाने तरुणांच्या हातात घंटा’ सामनातून केंद्रसरकारवर टीका

‘वडिलांचा रोजगार गेल्याने आपण आता कुटुंबास भार झालो या चिंतेतून वयात आलेल्या मुलींच्या आत्महत्येची प्रकरणे वाढू लागली आहेत. मोदींचे सरकार हे जगातले एकमेव उत्तम सरकार असल्याचे अंध भक्तांचे म्हणणे आहे.अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला व मंदिरांच्या नावाने राजकीय घंटा बडवायला काहीच हरकत नाही.’ अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.

    देशाच्या आर्थीक प्रगतीत २०.१ टक्क्यांची वाढ झाल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं. २०२१-२२ या आर्थीक वर्षातील पहिल्या तिमाहीतील आकडेवारी  केंद्रसरकारने जाहिर केली. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळातील हा जीडीपी असल्याचं केंद्र सरकारडून सांगण्यात आलं. पण, देशातील वाढती बेरोजगारी आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या यावर आवाज न उठवता भाजप नेत्यांकडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केली जात आहेत. यावरुन आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली.

    ‘अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला व मंदिरांच्या नावाने राजकीय घंटा बडवायला काहीच हरकत नाही.’ अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.

    काय म्हटलय सामनात?

    देशातील उद्योग क्षेत्र थंड पडले आहे. नोकऱ्या गमावल्याने लोकांनी आत्महत्या केल्या. वडिलांचा रोजगार गेल्याने आपण आता कुटुंबास भार झालो या चिंतेतून वयात आलेल्या मुलींच्या आत्महत्येची प्रकरणे वाढू लागली आहेत. मोदींचे सरकार हे जगातले एकमेव उत्तम सरकार असल्याचे अंध भक्तांचे म्हणणे आहे. अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला व मंदिरांच्या नावाने राजकीय घंटा बडवायला काहीच हरकत नाही, पण लाखो लोकांनी रोजगार गमावला आहे आणि त्यातून जे आर्थिक अराजक निर्माण झाले आहे, त्याचे काय? या संकटाचा सामना केंद्र सरकार कसा करणार आहे? नोकऱ्यांचे काय करणार? घंटा बडवून बेरोजगारी हटणार असेल तर तसे स्पष्ट करावे!