तोडफोड ही भाजपची संस्कृती नाही. आमच्य़ासाठी विषय संपला : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

लाड यांच्या या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसाद लाड यांच्यावर प्रतिक्रिया दिली. लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यासंबंधी आमचे शाखाप्रमुख बोलतील असा खोचक वार संजय राऊत यांनी केला. तर नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लाड यांच्या वक्तव्यावर मिश्किल भाष्य करताना ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असे म्हणत खिल्ली उडवली आहे.

    मुंबई : तोडफोड करणे भाजपची संस्कृती नाही. आमच्य़ासाठी हा विषय संपला आहे, असे म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद लाड यांच्या कथित वक्तव्यांवरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आले तर सोडत नाही.  भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवन पाडण्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यांचा इन्कार केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

    राऊत- भुजबळांनी उडविली खिल्ली
    दरम्यान, लाड यांच्या या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसाद लाड यांच्यावर प्रतिक्रिया दिली. लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यासंबंधी आमचे शाखाप्रमुख बोलतील असा खोचक वार संजय राऊत यांनी केला. तर नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लाड यांच्या वक्तव्यावर मिश्किल भाष्य करताना ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असे म्हणत खिल्ली उडवली आहे.