सुरक्षेच्या मुद्द्यावरून सचिन सावंत यांची भाजपवर खोचक टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससह अनेक नेत्याच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. सुरक्षेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.

मुंबई: महाविकास आघाडीने सरकारने राज्यातील भाजपच्या नेत्याच्या सुरक्षेबदल करण्यात निर्णय घेतला. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससह अनेक नेत्याच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. सुरक्षेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.

‘ भाजपा नेत्यांना धोका नसल्याने सुरक्षा कमी झाली तर आकांडतांडव, आक्रोश, आकांत, विलाप , बोंब इ. भावना उचंबळू लागल्या. परंतु गांधी परिवाराला धोका असतानाही त्यांची व डॉ मनमोहन सिंहांची सुरक्षा, स्टाफ कमी करताना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मोदीजींची सूड भावना असते, मविआ सरकारची नाही. अशी खोचक टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.