सचिन तेंडुलकरला कोरोनाचा संसर्ग; कुटुंबातील इतर सदस्यांचे रिपोर्टस निगेटिव्ह ट्विट करू दिली माहिती

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: ट्विट करुन सचिनने ही माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी मी घेत होते, तरीही मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून कुटुंबियातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

    मुंबई: राज्यात वेगाने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकत्या सर्व उपाय योजना करण्याचा प्रयत्न राज्यसरकार करत आहे. नागरिकांवरही अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.   लसीकरण देखील सुरु आहे.

    दरम्यान, आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: ट्विट करुन सचिनने ही माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी मी घेत होते, तरीही मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून कुटुंबियातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. घरामध्ये स्वतःचे विलगीकरण करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. जे माझ्या सह देशभरतील लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत धीर देत आहेत, असे म्हटले आहे.

    घरीच विलगीकरण करून डॉक्टरांच्या सल्ल्याने तेंडुलकरवर उपचार सुरू आहेत.