सचिन वाझेंची होणार ओपन हार्ट सर्जरी, वोक्हार्ट रुग्णालयात झाले दाखल

निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांची ओपन हार्ट सर्जरी होणार आहे. कोर्टाच्या परवानगीनंतर वाझे वोक्हार्ट रुग्णालयात दाखल(Sachin Vaze Admitted in Wockhardt Hospital) झाले असल्याची माहिती वाझेंच्या वकिलांनी दिली आहे.

    मुंबई : अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण (Antilia Bomb Case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder Case) प्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Open Heart Surgery Of Sachin Vaze) यांची ओपन हार्ट सर्जरी होणार आहे. कोर्टाच्या परवानगीनंतर वाझे वोक्हार्ट रुग्णालयात दाखल(Sachin Vaze Admitted in Wockhardt Hospital) झाले असल्याची माहिती वाझेंच्या वकिलांनी दिली आहे. वाझेंच्या हृदय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे वकीलांनी याआधी कोर्टात सांगितले होते.

    दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवली, त्याची कारणं मिळाली आहेत. सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळेल, अशी आशा सचिन वाझेला होती, मात्र याच्या उलट सगळे झाले.

    सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाला होता. मात्र ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर २०२० मध्ये तो परत पोलीस दलात दाखल झाला. वाझेला थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिटचे प्रमुख पद मिळालं. नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेला सचिन वाझे जवळपास १६ वर्षांनंतर २०२० मध्ये पोलिस दलात परतला होता. मात्र मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर, त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.