udhav thackrey

एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे.

  मंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली.  मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे.

  सर्वांची गैरसोय झालेली आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशन समाप्त झालं, कोरोनामुळे आव्हानात्मक होतं. पण कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी सहकार्य केलं. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या अर्थसंकल्पावर आज चर्चा झालेली आहे. हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर हे अधिवेशन समाप्त करण्यात आलं असून पुढच्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली आहे. एकूणच गेले१०दिवस जे काही झालं, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  आधी फाशी नंतर तपास असा न्याय देण्याचा प्रयत्न नको 
  आधी फाशी नंतर तपास करा अश्या प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न विरोधीपक्षांनी करू नये अश्या शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अधिवेशना नंतर विरोधकांना फटकारले आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या प्रकणात सरकारने गुन्हा नोंदवून घेतला आहे.  वाझे पूर्वी शिवसेनेत होते. मात्र सध्या त्यांचा पक्षाशी संबंध नाही असे सांगताना त्यांनी डेलकर प्रकरणात मात्र प्रशासक असलेले पटेल भाजपचे माजी मंत्री आहेत असे ते म्हणाले. चौकशी नंतर दोषी कुणीही असतील त्यांच्यावर कारवाई करू ही पध्दत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संस्थगित झाले आहे पुढील अधिवेशन पाच जुलै रोजी होणार असल्याची घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली.

  नाणार बाबत भुमिका पूर्वीप्रमाणेच
  मुख्यमंत्री म्हणाले की १३ कोटी जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प मांडला आहे या जनतेच्या हिताला प्राधान्य देणे हे सरकारचे कामआहे असे ते म्हणाले. हिरेन यांच्या हत्येबाबत सरकारला गांभिर्य आहे या प्रकरणी विरोधकांकडे असलेली माहिती त्यांनी द्यावी त्याबाबत योग्य तो तपास करून दोषी विरोधात कारवाई केली जाईल. नाणार बाबत शिवसेनेची भुमिका पूर्वी होती तीच राहणार असून स्थानिक जनतेच्या हिताशी तडजोड केली जावू शकत नाही. पर्यायी जागा स्थानिकांना मान्य असेल तर नाणार नाही रिफायनरी मात्र होवू शकेल असे ते म्हणाले. आरे च्या कारशेड बाबतचा विषय न्यायालयात आहे मात्र कांजूरला कारशेड करणे भविष्यासाठी जास्त सोयीची आहे असे  आमचे मत आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

  रडगाणे न गाता अर्थसंकल्प
  ते म्हणाले की आर्थिक आव्हाने असताना रडगाणे न गाता सरकारने सा-या घटकांच्या हिताचा  अर्थसंकल्प मांडल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील वीज देयकांची वसुली अधिवेशन होईपर्यंत थांबविण्यात आली होती मात्र विज वितरण कंपनी स्थिती नाजूक असली तरी ३० हजार कोटीची देयके माफ करण्यात येत असून केवळ १५ हजार कोटी रूपयांची वसुली केली जात आहे असे ते म्हणाले.