सचिन वाझेची ओपन हार्ट सर्जरी

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे.

    कोर्टाच्या परवानगीनंतर वाझेवर मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी वाझे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याची माहिती कालच त्याच्या वकिलांनी दिली होती.

    वाझेच्या हृदयावर शस्त्रक्रियेची गरज जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केल्याचा दावा, वकिलांनी याआधी कोर्टात केला होता. त्यानुसार वाझे मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल झाला होता. मंगळवारी वाझेवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. वाझेची प्रकृती सध्या स्थिर आहे.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना