पोलीस मुख्यालयात रचला सचिन वाझेंनी सगळा कट, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची घेतली भेट

एनआयएला(NIA) सचिन वाझे(sachin waze) आणि मनसुख हिरेन(mansukh hiren) हे एकाच गाडीत बसून मुंबई पोलीस मुख्यालयात जातानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडले आहे. हा या प्रकरणातला महत्त्वाचा पुरावा आहे. एनआयएने मुंबई पोलीस मुख्यालयात छापा टाकत अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.

    मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळालेल्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांचे नाव समोर आले. त्यांचा मृत्यू झाला. सचिन वाझेंचे नाव या प्रकरणात समोर आले. आत्तापर्यंतच्या तपासावरून हे स्पष्ट होते की हा संपूर्ण कट पोलीस मुख्यालयात रचण्यात आला होता. पोलीस मुख्यालयात आधीपासूनच मनसुख हिरेन यांचे येणे- जाणे होते.

    एनआयएला सचिन वाझे आणि मनसुख हिरेन हे एकाच गाडीत बसून मुंबई पोलीस मुख्यालयात जातानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडले आहे. हा या प्रकरणातला महत्त्वाचा पुरावा आहे. एनआयएने मुंबई पोलीस मुख्यालयात छापा टाकत अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.

    दरम्यान या तपासाचे नेतृत्व करणाऱ्या आयजी शुक्ला यांनी आज नवे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. यावेळी संयुक्त पोलीस आयुक्त(क्राईम) मिलिंद भारंबे आणि पोलीस उपायुक्त एस चैतन्यदेखील हजर होते. भारंबेंनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार शुक्ला यांनी नगराळेंकडून मनसुख हिरेन प्रकरणात सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नगराळेंनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

    सचिन वाझेंनीच अंबानींच्या घरी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती. तसेच पोलीस मुख्यालयातील सीआययुच्या कार्यालयात हा संपूर्ण कट रचला असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २० जिलेटीननी भरलेली स्कॉर्पिओ २४ फेब्रुवारीला मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आली होती. या गाडीच्या मागे असलेली इनोव्हा कार सीआययूची होती.

    एनआयएच्या तपासात हे सिद्ध झाले आहे की, सचिन वाझेंनीच स्कॉर्पिओ चालवत अंबानीच्या घराबाहेर नेऊन पार्क केली आणि ते इनोव्हामध्ये बसून निघून गेले. त्यावेळी त्यांनी पीपीई किट तसेच कुर्ता आणि पायजमा घातला होता. कुर्ता -पायजमा खरेदी केलेेल्या दुकानाचा तपास लावण्यात आला. हा ड्रेस नंतर मुलुंड टोलनाका क्रॉस केल्यावर ठाण्यात तेल टाकून जाळण्यात आला होता.  एनआयएला सापडलेल्या मर्सिडिझमध्ये ५ लाख रुपये , नोटा मोजण्याची मशीन , बिअर बॉटल आणि तेल सापडले.