सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत; तपास यंत्रणेचा सत्र न्यायालयात दावा

सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच चौकशीला सामोरं जाताना सचिन आपला फोन घेऊन आले नव्हते, तसेच ते कुटुंबियांचा नंबरही देण्यास तयार नव्हते म्हणून शेवटी त्यांना अटक करावी लागली आणि त्यांच्या पोलीस ठाण्याला कळवावे लागले अशी माहिती एनआययएच्या वतीने न्यायालयात देण्यात आली.

  मुंबई : अंबानी घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे तपास सहकार्य करत नसल्याचा दावा सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या वतीने करण्यात आला. त्यामुळे त्यांना रात्री उशिरा अटक करावी लागणी आणि त्यांच्या पोलीस स्टेशनला कळावेव लागले, अशी माहिती तपासयंत्रणेनेच्या वतीने न्यायालयात देण्यात आली.

  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन याच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली.

  त्यानंतकर एनआयए विशेष न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. त्याविरोधात सचिन यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून सदर अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत आपल्याला वकिलांशीही भेटू दिले जात नसल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. त्यास एनआयएकडून तीव्र विरोध करण्यात आला.

  सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच चौकशीला सामोरं जाताना सचिन आपला फोन घेऊन आले नव्हते, तसेच ते कुटुंबियांचा नंबरही देण्यास तयार नव्हते म्हणून शेवटी त्यांना अटक करावी लागली आणि त्यांच्या पोलीस ठाण्याला कळवावे लागले अशी माहिती एनआययएच्या वतीने न्यायालयात देण्यात आली.

  एनआयएच्या इंट्रोगेशन रूममध्ये सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याची वाझेंच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्या आरोपाचेही एनआयएने खंडन केले. वाझेंना शनिवारी दिवसभर एसपींच्या दालनात बसविण्यात आले होते. तिथे सीसीटिव्ही कॅमेऱ्याची सोय नाही, मात्र, इंट्रोगेशन रूममध्ये सीसीटिव्ही असल्याची एनआयएने स्पष्ट केले. वाझेंची चौकशी करताना त्यांच्या केस डायरीत काही अनियमितता आढळल्या म्हणून सहाय्यक आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती एनआयएच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. तसेच वकिलांना भेटण्यासाठी वाझेंना मज्जाव करण्यात आलेला नाही त्याबाबत मंगळवारी वकिलांच्या भेटीच्या वेळा न्यायालयाला कळविण्यात येतील असेही स्पष्ट केले. मात्र वेळेअभावी सुनावणी मंगळवारपर्यत तहकूब करण्यात आली.

  सदर प्रकरणात एनआयएच्या मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन दुरुस्ती विभागाने अंबानी प्रकरणी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी जप्त केली असून ही गाडी वाझे यांच्या शासकीय पथकाने वापरली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून त्याबाबत वाझे यांनी कबूली दिली असल्याचे एनआयएने म्हटले आहे. तसेच या कटात अन्य व्यक्तीचाही सहभाग असल्याचा संशयही एनआयएने व्यक्त केला आहे.