मनसुख हिरेनची हत्या सचिन वाझेनीच केली, एनआयएच्या चार्जशीटमध्ये वाझे नंबर एकचा आरोपी

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन(Mansukh Hiren Case), ज्याचा मृतदेह मुंब्राच्या खाडीत सापडला होता. त्याची हत्या सचिन वाझे(Sachin Waze) यानेच केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मनसुखच्या हत्येची सुपारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला देण्यात आल्याचाही आरोप आहे. अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या या स्वत: वाझेनीच ठेवल्याचा उल्लेखही आरोपपत्रात करण्यात आला आहे.

    मुंबई :अँटिलियाच्या बाहेर स्फोटक ठेवण्याच्या प्रकरणात एनआयएच्या वतीनं आरोपपत्र(NIA Chargesheet In Mansukh Hiren Case) दाखल करण्यात आले आहे, या आरोपपत्रात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. या आरोपपत्रात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे(Sachin Waze) याला आरोपी क्रमांक १ ठरविण्यात आले आहे.

    ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन, ज्याचा मृतदेह मुंब्राच्या खाडीत सापडला होता. त्याची हत्या सचिन वाझे यानेच केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मनसुखच्या हत्येची सुपारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला देण्यात आल्याचाही आरोप आहे. अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या या स्वत: वाझेनीच ठेवल्याचा उल्लेखही आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्यानेच मुकेश अंबानी यांना धमकी देणारे पत्रही स्कॉर्पिओत ठेवले होते, असा उल्लेखही करण्यात आला आहे. मुकेश अंबांनीकडून खंडणीची मोठी रक्कम घेण्याच्या तयारीत वाझे आणि त्याचे सहकारी होते, असा उल्लेखही करण्यात आला आहे.

    अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर, या प्रकरणाचे मोठे पडसाद राज्यात आणि देशात उमटले होते. त्यानंतर या प्रकरणात मनसुख हिरेन याचे नाव समोर आले, त्यानंतर हिरेन याचा मृतदेह ठाण्याजवळच्या खाडीतून जप्त करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात धक्कादायक उकल होत राहिली.