वाझे दुसऱ्यांदा निलंबित; पोलिस दलाकडून अद्याप औपचारीक माहिती नाही

एनआयए कोर्टाने कोठडी सुनावल्यानंतर सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणताही अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त वेळ पोलिस कोठडीत असेल तर त्याचे निलंबन होते. त्यामुळे वाझे यांना निलंबित करण्यात आले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिस दलाकडून याबाबत अद्याप औपचारीकपणे माहिती जारी करण्यात आलेली नाही.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२० बी आणि ४ (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम १९०८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर वाझेंची एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

    एनआयए कोर्टाने कोठडी सुनावल्यानंतर सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणताही अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त वेळ पोलिस कोठडीत असेल तर त्याचे निलंबन होते. त्यामुळे वाझे यांना निलंबित करण्यात आले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिस दलाकडून याबाबत अद्याप औपचारीकपणे माहिती जारी करण्यात आलेली नाही.

    वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी १९ मार्चला सुनावणी होणार होती. मात्र, त्या आधीच त्यांना अटक झाली आहे.

    मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.