मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

    मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी विशेष न्यायालयात हजर करून एनएआयने २५ मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला होता. सचिन वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. पण मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयित असलेल्या वाझेंना अटक करण्यात आली होती.