सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. त्यांची चौकशी सुरू असून मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिशनर मिलिंद भारंबे (Milind Bharambe) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांन एनआयए बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसठी बोलावण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

    मुंबई : पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक झालानंतर दररोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणीत आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) कारवाईचा फास आणखी आवळला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावण्यात येण्याची शक्यता हे.

    सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. त्यांची चौकशी सुरू असून मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिशनर मिलिंद भारंबे (Milind Bharambe) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांन एनआयए बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसठी बोलावण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

    दरम्यान, NIA च्या आधिकाऱ्यांनी सचिन वाझेंच्या घराची झाडाझडती केली होती. त्यावेळी एक ड्रेस जप्त करण्यात आला आहे. स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासाठी दोन ड्रेस वापरण्यात आले होते. त्यातला एक शर्ट मुलूंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. बुधवारी रात्री वाझेंच्या घराच्या झडतीत एक कार जप्त केली आहे.