सचिन वाझेला हवे घरचे जेवण; आणखी एक मागणी कोर्टाने नाकारली

खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी सचिन वाझेने मागितली. त्याचबरोबर घरच्या सदस्यांना भेटण्याची आणि घरचे जेवण मिळण्याबाबतही वाझेने परवानगी मागितली. सचिन वाझेच्या वकिलांनी एनआयए कोर्टात यासंबंधी अर्ज केला. दरम्यान, एनआयएचे विशेष न्यायाधीश प्रशांत शिंत्रे यांनी वाझेची कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी नाकारली आहे.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणातील आरोपी आणि निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला घरचे जेवण हवे आहे. तर कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची परवानगीही त्याने एनआयए न्यायालयाला मागितली आहे. यातील कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी न्यायालयाने नाकारली आहे.

    खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी सचिन वाझेने मागितली. त्याचबरोबर घरच्या सदस्यांना भेटण्याची आणि घरचे जेवण मिळण्याबाबतही वाझेने परवानगी मागितली. सचिन वाझेच्या वकिलांनी एनआयए कोर्टात यासंबंधी अर्ज केला. दरम्यान, एनआयएचे विशेष न्यायाधीश प्रशांत शिंत्रे यांनी वाझेची कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी नाकारली आहे.

    मात्र इतर दोन अर्ज म्हणजेच खाजगी रुग्णालयात उपचार आणि घरच्या जेवणासंदर्भात 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. वाझेला तीन हार्ट ब्लॉकेजेस असून बायपास सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सचिन वाझे वेळोवेळी एनआईय मार्फत जेजे रुग्णाल्यात उपचार घेत आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]