mansukh hiren

एनआयएच्या(NIA) हाती आता असे पुरावे लागले आहेत ज्यावरून हे स्पष्ट होते की मनसुख हिरेनच्या(Mansukh Hiren) पोस्टमार्टमच्या वेळी एपीआय सचिन वाझे(sachin waze present at mansukh post mortem ठाण्यातील सरकारी दवाखान्यामध्ये उपस्थित होते. यासंदर्भात आता ३ डॉक्टरांची चौकशी होणार आहे.

  अँटिलिया प्रकरणामध्ये मिळालेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन(mansukh hiren case) यांच्या हत्येच्या प्रकरणाची वेगाने चौकशी सुरु आहे. एनआयएच्या हाती आता असे पुरावे लागले आहेत ज्यावरून हे स्पष्ट होते की मनसुख हिरेनच्या पोस्टमार्टमच्या वेळी एपीआय सचिन वाझे ठाण्यातील सरकारी दवाखान्यामध्ये उपस्थित होते. यासंदर्भात आता ३ डॉक्टरांची चौकशी होणार आहे.


  डॉक्टर्सना कोणते प्रश्न विचारले जाणार ?

  • पोस्टमार्टमच्या वेळी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का ? पोस्टमार्टमची व्हिडिओग्राफी झाली होती का?
  • डॉक्टरांना कोण भेटलं होतं ? काय बोलणं झालं होतं ? कुणाचा फोन आला होता का?
  • पोस्टमार्टमसाठी संपूर्ण सॅम्पल पहिल्यांदाच फॉरेन्सिकसाठी का पाठवण्यात आले नाहीत ?
  • डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये आलेल्या लोकांची माहिती मागवण्यात येईल. एटीएसच्या तपासात असे समोर आले होते की डॉक्टरांना भेटणाऱ्या लोकांचा कोणताही लेखी रेकॉर्ड नाहीये.
  • सचिन वाझे पोस्टमार्टमच्या जागी काय करत होते? ते अधिकारी म्हणून तिथे आले होते की डॉक्टरांवर त्यांना कोणता दबाव टाकायचा होता?

  पोस्टमार्टमच्या जागी मनसुखच्या भावाची वाझेंनी घेतली होती भेट
  तपासात असे समोर आले आहे की, वाझे ५ मार्चला संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी क्राईम ब्रॅन्चचे अधिकारी अलकनूर यांची भेट घेतली होती. एनआयए अलकनुर यांचीही चौकशी करणार आहे. अलकनुर यांना एनआयए विचारणार आहे की पोस्टमार्टम हाऊसमध्ये जाण्याची परवानगी त्यांनी वाझेंना दिली होती का? तपासात असेही स्पष्ट झाले आहे की मनसुखचा भाऊ विनोद हिरेन यांची वाझेंनी पोस्टमार्टमच्या ठिकाणी भेट घेतली होती. त्याबाबतही चौकशी होणार आहे.